प्रातिनिधिक
प्रातिनिधिक
धुळे

धामणगावातील तलाठी एसीबीच्या जाळ्यात

शेतकऱ्याकडून ७०० रू. मागणे पडले महागात

Rajendra Patil

धुळे | प्रतिनिधी Dhule

तालुक्यातील धामणगाव शिवारातील तक्रारदाराच्या वडीलांच्या नावे असलेले दोन शेत गटांचे सातबारा उतार्‍यावर बँकेचा पिक कर्जाचा बोजा चढविण्यासाठी शासकीय फिसह ७०० रूपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी धामणगाव (वणी खुर्द) तलाठी व सध्या धुळे ग्रामीण तहसील कार्यालयात कार्यरत महेंद्र वामनराव धाकड (वय ५७) यांना धुळे एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले आहेत.

वरिष्ठाचे आदेशानंतर आज दुपारीही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान यापुर्वी एसीबीच्या पथकाने सापळा कारवाई केली. मात्र महेंद धाकड यांना कारवाईचा सुगावा लागल्याने त्यांनी तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्विकारली नव्हती.

Deshdoot
www.deshdoot.com