स्पिरीटची अवैधरित्या वाहतुक: सोनगीर पोलीसांची कारवाई

ट्रकसह नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त, आरोपी ताब्यात,
स्पिरीटची अवैधरित्या वाहतुक: सोनगीर पोलीसांची कारवाई

सोनगीर Songir /वार्ताहर-

अवैधरित्या स्पिरिटची वाहतूक Illegal transport of spirits करणाऱ्या आयशर ट्रकला Truck सोनगीर पोलिसांनी Songir Police पकडले. चालकाला In possession घेत ट्रकसह 8 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आयशर ट्रकमधून (क्र. एमएच -१८ एसी-२१११) बनावट दारु बनविण्यासाठी उपयोगी पडणारे रसायनचे (स्पिरिट) ड्रम वाहतुक करुन धुळ्याकडुन शिरपुरकडे घेवुन जात असल्याची गुप्त माहिती सपोनि चंद्रकांत पाटील यांना मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ट्रकचा शोध सुरू केला.

टोल नाक्याच्या पुढे सर्विस रोडला साडेनऊ वाजेच्या सुमारास संशयित ट्रक शिरपूर च्या दिशेने जात असल्याचे दिसले. पथकाने ट्रक चालकास थांबण्याचा इशारा दिला. त्याने ट्रक सर्विस रस्त्यावर थांबविली. चालकाला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने ताज्जोदीन इसामोद्दीन शेख (वय-३१वर्ष रा.लालसरदार नगर, देवपुर, धुळे) असे सांगितले.

त्याला ट्रकमध्ये काय माल आहे, असे विचारले असता. त्याने १४ ड्रम असुन त्यात दारु बनविण्याचे स्पिरीट आहे. हे स्पिरीट मला राकेश जैन व सज्जु उर्फ सादीक मोहदिन शेख यांनी हर्षीत रोड लाईन्स अभय कॉलेज जवळ, मुंबई-आग्रा रोड जवळुन भरुन गाडी माझ्याकडे शिरपुरला जाण्यासाठी दिली त्यावेळी राकेश जैन याने मला सांगितले की, तु शिरपुरच्या दिशेने स्पिरीट घेवुन चल मला देवा केदार याने माल कोठे खाली करायचा आहे, असे सांगितल्यानंतर मी तुला सांगतो असे सांगुन राकेश जैन याने आम्ही तुमच्या गाडीच्या मागे पुढे राहणार आहोत, अशी हकीकत सांगितली.

त्यानंतर पथकाने ट्रकची ताडपत्री बाजुला करुन पाहिले असता त्यात एकुण १४ निळे रंगाचे ड्रम दिसुन आले. त्यात बनावट दारु बनविण्याकामी उपयोगी पडणारे रसायन (स्पिरिट) मिळुन आले. चालकाकडे स्पिरीट मालाचा कुठलाही परवाना मिळून आला नाही. २ लाख ८० हजार रुपये किंमतीचे स्पिरिटचे १४ प्लॅस्टिकचे ड्रम व 6 लाखांचा ट्रक असा एकुण ८ लाख ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी सोनगीर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक

पोलीस निरिक्षक चंद्रकांत पाटील, उपनिरीक्षक नामदेव सहारे ,पोहेकॉ शामराव आहीरे , पोना शिरीष भदाणे, संजय जाधव , पोकॉ किरण पारधी, सुरजकुमार सावळे, विजय पाटील, रामकृष्ण बोरसे यांनी केली आहे. पुढील तपास उप निरीक्षक नामदेव सहारे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com