धुळे । प्रतिनिधी Dhule

रागात माहेरी गेलेली पत्नी परत येत नसल्याने दारूच्या आहारी गेलेल्या पतीने विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत शिरपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नाेंंद करण्यात आली आहे.

संजय अमत माळी (वय 36 रा. वाघाडी बुद्रूक ता. शिरपूर) असे मयताचे नाव आहे. त्याची पत्नी दोन महिन्यांपूर्वी माहेरी निघून गेली. ती परत येत नसल्यामुळे संजय दारूच्या अधिकच आहारी गेला. तो दोन दिवसांपुर्वी घरातून निघून गेला होता.

काल दि. 26 रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारारास गावातील एका शाळेच्या आवारातील विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आहे. त्याने विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याबाबत भीमा मुकूंदा माळी यांच्या माहितीवरून शिरपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.