चिमठाण्यात घराला आग, चार लाखांचे नुकसान

घरामध्ये देव्हार्‍यातील दिव्याने घेतला रात्री पेट, रोकडसह घरातील साहित्य जळून खाक
चिमठाण्यात घराला आग, चार लाखांचे नुकसान

दोंडाईचा - Dondaicha- श.प्र :

शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथे घरातील देवार्‍यातील दिव्याने रात्री अचानक पेट घेतला. त्यामुळे घराला आग लागली. या आगीत घरातील साहित्य व अन्य वस्तू जळून खाक झाले. आगीत तीन लाख 97 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

संतोषी माता मंदिरजवळ दगडू सहादू भोई यांच्या मालकीचे घर आहे. ते घर भाड्याने रत्नाबाई भीमराव लोहार यांनी घेतले आहे. दि. 20 जुलै रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास घरातील देवर्‍याजवळ लावलेल्या दिव्याने अचानक पेट घेतला. त्यामुळे घरात आग पसरली. या आगीत घरातील संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या.

रत्नाबाई लोहार हे रात्री घरातील ओट्यावर झोपलेले होते. घरातून 1 वाजेच्या सुमारास धूर निघत असल्याचे त्यांना दिसले. आग लागल्याचे दिसून आले.

परंतू आगीने रुद्र रुप घेतले. ग्रामस्थांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. पण तो अपयशी ठरला. शिंदखेडा नगर पंचायतीची अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. त्यानंतर थोड्याच वेळात बंब दाखल झाला.

अग्निशमन दलाच्या पथकाने शर्तीचे प्रयत्न करुन आग आटोक्यात आणली. घरातील कपाट, सायकल, टीव्ही, अन्नधान्य, रोख रक्कम 35 हजार रुपये, कुलर, फ्रिज, टीव्ही, लोखंडी कपाट, पंखा, खुर्ची, बांधकाम करण्याचे लाकूड व घरातील संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाले. आगीत तीन लाख 97 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

सदर घटनेचा पंचनामा चिमठाणे गावाचे तलाठ्यांनी केला असून घर मालक रत्नाबाई लोहार यांनी लेखी तक्रार चिमठाणे पोस्ट व शिंदखेडा पोलीस निरीक्षक यांच्याकडे दिली आहे. पंचनामा योगेंद्र जयसिंग गिरासे, गणेश सुका वाडीले, प्रकाश उत्तम वाडीले, भाऊसाहेब धर्मा लोहार, नाना शामराव कोळी, सुनील शिंदे, सागर सुभाष वाडीले, योगेश लोहार आदी उपस्थित होते. आग त्वरीत आटोक्यात आणली. यामुळे मोठा अनर्थ टळला. कारण एका ओळीत घरे असल्यामुळे आग पसरण्याची शक्यता होती.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com