रुग्णालयांनी ऑक्सिजनच्या निर्मितीला चालना द्यावी !

जिल्हाधिकारी संजय यादव : रुग्णालयांच्या व्यवस्थापनासमवेत बैठक
रुग्णालयांनी ऑक्सिजनच्या निर्मितीला चालना द्यावी !
Sanjay Yadav

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्ह्यात करोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे ऑक्सिजनची मागणी वाढत आहे.

ऑक्सिजनचा दररोजचा वापर आणि भविष्यातील मागणी लक्षात घेवून शासकीय व खासगी रुग्णालयांनी ऑक्सिजन निर्मितीच्या प्रकल्पांना चालना देत ते तातडीने कार्यान्वित करावेत.

आरोग्य विभागाने ऑक्सिजनच्या मागणीबाबत जिल्ह्याच्या कृती आराखडा सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज ऑक्सिजनची मागणी आणि सद्य:स्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड,डॉ. महेश भडांगे, डॉ. संतोष नवले, डॉ. विशाल पाटील, विजय जाधव, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर आदी उपस्थित होते.

सद्य:स्थितीत परिस्थितीचा सामना करतांना 24 तास पुरेल एवढा ऑक्सिजन साठा ठेवावा. त्यातच कोरोना विषाणूच्या तिसर्‍या लाटेची भीती आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

त्यामुळे पुढील काही दिवस अत्यंत महत्वाचे आहेत. अशा परिस्थितीत रुग्णालयांनी स्वत:चे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प कार्यान्वित करण्यावर भर द्यावा.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com