माजी मंत्री हेमंत देशमुख यांची राष्ट्रवादीत घरवापसी

माजी मंत्री हेमंत देशमुख यांची राष्ट्रवादीत घरवापसी

शिंदखेडा

माजी मंत्री हेमंत देशमुख यांनी होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणूकीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाच्या आजी-माजी आमदारांची बैठक आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडत आहे. या बैठकीदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील माजी मंत्री हेमंत देशमुख कॉग्रेस पक्षातून पुन्हा एकदा राष्ट्रवादीमध्ये घरवापसी झाली.

माजी मंत्री हेमंत देशमुख यांची राष्ट्रवादीत घरवापसी
आता स्वस्तात करता येणार AC चा प्रवास

पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस खा. प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, गृहमंत्री ना. दिलीप वळसे पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ, खा. सुप्रियाताई सुळे, खा. सुनील तटकरे, खा.श्रीनिवास पाटील, खा. फौजिया खान, खा.वंदना चव्हाण, ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ, राष्ट्रीय प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री ना. नवाब मलिक, सार्वजनिक आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे, सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे, सहकार मंत्री ना. बाळासाहेब पाटील, अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे, गृहनिर्माण मंत्री ना.जितेंद्र आव्हाड, राज्यमंत्री ना. दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे, राज्यमंत्री ना. संजय बनसोडे, कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे तसेच पक्षाचे इतर प्रमुख नेते उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com