धुळे । प्रतिनिधी Dhule

साक्री तालुक्यातील धनेर, पिंपळनेर पट्ट्यात आज सायंकाळी वादळी पावसासह जोरदार गारपीट झाली. यामुळे शेतांमध्ये गारांचा खच पडला.

सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास वादळी पावसाळा सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाल्याने गहू, हरबरा,वाटाणे, जवस, ज्वारी आणि कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले.

शिंदखेडा तालुक्यातही मुसळधार पाऊस झाला. तर धुळ्यात हलक्या सरी कोसळल्यात. या अवकाळी पावसाने शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. सुमारे 3 तास पाऊस सुरूच होता.