धुळे शहरात जोरदार पाऊस

धुळे शहरात जोरदार पाऊस
पाऊस File PhotoRain

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शहरासह परिसरात आज मोठ्या खंडानंतर जोरदार पाऊस झाला. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण होवून धुळेकरांची उकाड्यापासून काहीशी सुटका झाली.

शहरासह परिसरात पंधरा दिवसांपासून तर काही भागात महिनाभरापासून पाऊस गायब झाला आहे. पाऊस नसल्यामुळे उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे.

तर शेती पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे सर्वांनाच पावसाची प्रतिक्षा लागून होती. आज दुपारनंतर शहरात ढगाळ वातावरण होते. तर सायंकाळी ढगांनी गर्दी करत साडेसहा वाजता पावसाला सुरूवात झाली.

साधारण अर्धा ते एक तास चांगला पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे सर्वांची धावपळ उडाली. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. दरम्यान जिल्ह्यात पावसाची प्रतिक्षा कायम आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com