हस्ती स्कूलला राष्ट्रीय पातळीवरील हॅप्पी स्कूल अवॉर्डचा सन्मान !

हस्ती स्कूलला राष्ट्रीय पातळीवरील हॅप्पी स्कूल अवॉर्डचा  सन्मान !

दोंडाईचा - Dondaicha - वि.प्र :

दोंडाईचा परिसरात इंग्रजी माध्यमाचे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण देण्यात गेल्या 19 वर्षापासून सदैव अग्रेसर असणार्‍या हस्ती चॅरिटेबल ट्रस्ट संचलीत हस्ती पब्लिक स्कूल अँड ज्यु. कॉलेजला एज्यु. एक्सलन्स, दिल्ली तर्फे राष्ट्रीय पातळीवरील हॅप्पी स्कूल अवॉर्डचा सन्मान नुकताच प्राप्त झाला आहे.

अखिल भारतीय पातळीवर शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणार्‍या एज्यु एक्सलन्सतर्फे गोवा येथे आयोजित पारितोषिक वितरण समारंभात हॅप्पी स्कूल -प्लॅटिनम अवॉर्ड, प्रदान करण्यात आला. याप्रसंगी एज्यु. एक्सलन्स कमिटी लिडर डॉ. हरिष चौधरी, मुक्ता मिस्रा हे उपस्थित होते.

यात रायन इंटनॅशनल स्कूल - मालाड, हस्ती पब्लिक स्कूल अँड ज्यु. कॉलेज - दोंडाईचा, श्री श्री रविशंकर विद्या मंदिर - पुणे यांना हॅप्पी स्कूल प्लॅटिनम अवॉर्डचा सन्मान प्राप्त झाला. तसेच राजमाता कृष्ण कुमारी गर्ल्स पब्लिक स्कूल - जोधपूर व सेंट अंजनी पब्लिक स्कूल - लखनौ यांना गोल्ड अवार्ड सन्मान व स्वर्णिम इंटरनॅशनल स्कूल - कलकत्ता, दिवान इंटरनॅशनल स्कूल- मेरठ, कन्फ्ल्युएन्स वर्ल्ड स्कूल- कोटा यांना एक्झिक्युटिव्ह अवार्डचा सन्मान प्रदान करण्यात आला.

हस्ती स्कूलचे वैशिष्टे म्हणजे ही शाळा फक्त विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण देण्यातच नव्हे तर या शिक्षणासोबत बोर्ड परीक्षांचा निकाल, स्पर्धा परीक्षा, विज्ञान, कला, क्रिडा, स्काउट-गाईड, चित्रकला या सर्वच क्षेत्रांमध्ये अग्रेसर आहे. यात अतिशय कमी कालावधीत या विविध क्षेत्रात हस्ती स्कूलने पंचक्रोशित व जिल्ह्यातच नव्हे तर राज्य व राष्ट्रीय पातळीवर आपल्या नावाचा लौकीक केला आहे.

या आधीही हस्ती स्कूलला महाराष्ट्र शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार व राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तसेच हस्ती पूर्व प्राथमिक स्कूलला अर्लि चाईल्ड हूड एज्युकेशन असोसिएशनतर्फे व आय.डी.ए. एज्युकेशनतर्फे राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारांचे सन्मान प्राप्त झाले आहेत. सोबतच यात एज्यु एक्सलन्सतर्फे राष्ट्रीय पातळीवरील हॅप्पी स्कूल प्लॅटिनम अँवार्ड प्राप्त झाल्यामुळे आणखी एक मानाचा तुरा हस्तीच्या शिरपेचात रोवला गेला आहे.

या यशाबद्दल हस्ती चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष किशोर जैन, शालेय समिती चेअरमन कैलास जैन, स्थानिक शालेय सल्लागार समिती अध्यक्ष डॉ. विजय नामजोशी तसेच प्राचार्य हरिकृष्ण निगम यांनी आनंद व्यक्त केला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com