बोराडी परिसरात वादळी वार्‍यासह गारपीट

वीज पुरवठा खंडीत, कांद्यासह फळबागांचे नुकसान
बोराडी परिसरात वादळी वार्‍यासह गारपीट

बोराडी - Boradi - वार्ताहर :

शिरपूर तालुक्यातील बोराडीसह परिसरात वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस झाला. तसेच गारपीटही झाली. या पावसामुळे शेतात उघड्यावर असलेला गुरांचा चार्‍यासह कांदा, भुईमूग व फळबाग यांचे नुकसान झाले. वीज पुरवठाही खंडीत झाला होता.

बोराडीसह परिसरात आज 22 मे रोजी सकाळपासून ऊन-सावलीचा खेळ सुरु होता. दुपारपर्यंत सुर्य आग ओकत होता.दुपारनंतर अचानक वातावरणात बदल झाला.

जोरदार वादळला सुरुवात झाली. आकाशात ढग जमा झाले. विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. काही ठिकाणी गारपीटही झाली.

या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागात बसला. उन्हाळी पिके काढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतमाल व चारा शेतात उघड्यावर पडला आहे.

पावसामुळे शेतकरी बांधवांची धावपळ उडाली. या पावसामुळे शेतातील चारा व शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com