धुळे : ४३ लाखांचा गुटखा जप्त
धुळे

धुळे : ४३ लाखांचा गुटखा जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Rajendra Patil

धुळे - Dhule

मुंबई-आग्रा महामार्गावरील रोकडोबा हनुमान मंदिराजवळील वकास हॉटेल समोर उभ्या ट्रकमधून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल ४३ लाखांचा गुटखा व तंबाखूचा साठा जप्त केला आहे. दि.४ रोजी रात्री ही कारवाई करण्यात आली.

आयशर ट्रकमधून (क्र. एम.एच.०४ जी.आर. ९६३२) मध्ये राज्यात बंदी असलेल्या गुटख्याची धुळे-मालेगाव रोडवरून वाहतूक केली जात असून तो ट्रक रोकडोबा हनुमान मंदिराजवळील विकास हॉटेल समोर उभा असल्याची गुप्त माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळाली.

त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तेथून चालक मोहम्मद रशीद नेवासअली शहा (वय- ४२, रा. सोहरा माफी, बजहरा, ता. मेहदावल, जि.संतकबीरनगर, उत्तरप्रदेश) याला ताब्यात घेतले. ट्रकमध्ये तपासणी केली असता एकूण ४३ लाख ६ हजार २३६ रूपयांचा केसर युक्त विमल पान मसाला व तंबाखूचा साठा मिळून आला.

हा पानमसाला व ७ लाखांचा ट्रक असा एकूण ५० लाखा ६ हजार २३६ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत, अपर पोलीस अधीक्षक राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत व त्यांचे पथकातील पोसई हनुमान उगले, पोना. प्रभाकर बैसाणे, श्रीकांत पाटील, पोकॉ. तुषार पारधी, मयुर पाटील, दीपक पाटील व क्युआरटी पथकातील पोना रविंद्र सांगळे, पोकॉ जयेश मोरे, संदिप पाटील व विनोद गांगुर्डे यांनी केली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com