धुळ्यात तब्बल दीड कोटींचा गुटका जप्त

एलसीबीची कारवाई, तीन वाहनांसह चालक ताब्यात
 धुळ्यात तब्बल दीड कोटींचा गुटका जप्त

धुळे । प्रतिनिधी Dhule

शहरातील साक्री रोड वरील हॉटेल महिंद्रा आणि नेर जवळ एकाच वेळी कारवाई करून सुमारे दीड कोटी रुपयांचा गुटका जप्त करण्यात आला आहे. एल सी बी ने ही कारवाई केली. साक्री रोड वरील हॉटेल महिंद्रा जवळ आयशर (एम एच 48 बी एस 3717) आणि आयशर (एम एच 48 ए जी 3718) यामधून प्रत्येकी 45 लाख 76 हजाराचा गुटका आणि पाच पाच हजाराची वाहने असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तर याच रस्त्यावर नेर गावाजवळ बच्छराज हॉटेल जवळ आयशर ( एम एच 48 ए वाय 3929) यातून 15 लाखाचा गुटका आणि पाच हजाराचे वाहन असे तिनही कारवाई मिळून एक कोटी 52 लाख 28 हजाराचा माल जप्त करण्यात आला.

या संदर्भात वाहन चालक महेंद्र रामनवल तिवारी, प्रमोद जयशंकर उपाध्याय आणि गोवर्धन जंगीलाल गौड सर्व राहणार यत्तरप्रदेश यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित,अप्पर अधीक्षक प्रमोद बच्छाव यांच्या मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या पथकाने ही कारवाई केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com