शेतकर्‍यांना काळ्या तांदळाच्या लागवडीबाबत मार्गदर्शन

शेतकर्‍यांना काळ्या तांदळाच्या लागवडीबाबत मार्गदर्शन

पिंपळनेर Pimpalner । वार्ताहर

साक्री तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील मांजरी येथे कृषी महाविद्यालय, पुणे College of Agriculture, Pune अंतर्गत कृषीकन्या तेजस्विनी अभिमान साबळे Tejaswini Abhiman Sable हिने ग्रामीण कृषी जागरुकता आणि कृषी औद्योगिक कार्यक्रमांतर्गत शेतकर्‍यांना काळ्या तांदळाच्या black rice लागवडीबाबत मार्गदर्शन Guidance on cultivation केले.

तसेच विविध पिकांचे नवीन वाण, हवामान बदलांची स्थिती, पीक उत्पादनाचे तंत्र आणि त्यांची अधिक उत्पादनासाठी सुधारीत कृषि विषयक पद्धतीचे माहिती शेतकर्‍यांना दिली. मांजरीतील शेतकरी आत्माराम लहानु बागुल यांनी काळ्या भाताची शेती करण्यास सुरवात केली आहे. त्यांना तांदळाविषयी अधिक माहिती कृषी खात्याकडून दिली जात आहे. या भाताच्या उत्पन्नासाठी जवळजवळ एकशे दहा दिवसांचा कालावधी लागतो. या नवीन उपक्रमामुळे शेतकरी बागूल यांना आर्थिक व पोषक फायदा होईल. त्यामुळे परिसरातील शेतकर्‍यांनी सुद्धा काळ्या तांदळाची लागवड करावी, असे आवाहन केले.

यावेळी आत्माराम बागुल, शांताराम वळवी, दिगंबर मावची, कन्हैयालाल अहिरे, सुमनबाई बागुल, सारिका पवार, अनिता कुवर, सुरेश चौधरी, अभिमन साबळे आदी शेतकरी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com