बोराडी । वार्ताहर Boradi

सरकारी नोकरांची सहकारी बँक अर्थात ग.स.बँकेची संचालक मंडळाच्या धुळे-नंदुरबार मतदार संघासाठी 2021-2025 या कालावधीसाठीच्या निवडणूकीचा आज निकाल लागला. त्यात लोकमान्य पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे.

पॅनलचे सर्वच 17 उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होवून लोकमान्य पॅनलचे गटप्रमुख व बँकेचे माजी चेअरमन निशांत रंधे व रवींद्र खैरनार यांनी नवा इतिहास रचला आहे.

ग.स बँकेच्या धुळे-नंदुरबार सर्वसाधारण मतदार संघासाठी 17 संचालक पदासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. लोकमान्य पॅनलतर्फे सर्व 17 जागांसाठी उमेदवार दिले होते.त्यात अगोदरच 4 संचालकांची बिनविरोध निवड झाली आहे.

धुळे व नंदुरबार जिल्हा सहकारी नोकरांची सहकारी बँक पंचवार्षिक निवडणूकीत उमेदवारांना मिळालेली मते- अहमदनगर जिल्हा सर्वसाधारण मतदारसंघात भरत वामन पवार-5475 (लोकमान्य पॅनल विजयी) व लोखंड उचल उत्तम जाधव-161 मते मिळाली. तसेच अनुसूचित जाती-जमाती गटात प्रवीण साहेबराव गवळे-308, विनोद किसन मोहोड-128, वसंत रामा वळवी-5178 (लोकमान्य पॅनल विजयी) मते मिळाली.

तसेच महिला राखीव मतदारसंघात संगिता राजाराम आव्हाड-397, सोनाली अविनाश भामरे-5146 (लोकमान्य पॅनल विजयी) , विद्या रामकृष्ण मोरे- 5085 (लोकमान्य पॅनल विजयी), सबिना निसार शेख-148 मते मिळाली.

सर्वसाधारण मतदार संघात शामकांत पोपटराव अहिराव-503, रवींद्र सुखदेव आहिरे-4989 (लोकमान्य पॅनल विजयी), संगीता राजाराम आव्हाड-366 , प्रेमानंद अमृतलाल उपाचार्य-224 , वसंत गेंडा चव्हाण-5041 (लोकमान्य पॅनल विजयी), प्रदीप नवल देवरे-5102 (लोकमान्य पॅनल विजयी), बबन शिवदास नगराळे-4977 (लोकमान्य पॅनल विजयी), गमन साहेबराव पाटील-5104 (लोकमान्य पॅनल विजयी), चंद्रशेखर साहेबराव पाटील-5121 (लोकमान्य पॅनल विजयी), जितेंद्र नवलराव पाटील-5063 (लोकमान्य पॅनल विजयी), निलेश दत्तात्रय पाटील-5044 (लोकमान्य पॅनल विजयी), सुनिल तुकाराम पाटील-5027 (लोकमान्य पॅनल विजयी), शिरीष माधवराव बिरारीस-4980 (लोकमान्य पॅनल विजयी), युवराज ओंकार बोरसे-225 , प्रवीण धनराज भदाणे-5027 (लोकमान्य पॅनल विजयी), संदीप कैलासराव मराठे -4925 (लोकमान्य पॅनल विजयी), महिंद्र रामदास महाजन-236 , प्रशांत नारायण माळी-185 , शंशाक विश्वसराव रंधे-4864 (लोकमान्य पॅनल विजयी), संजय भीमराव लोंढे- 235, रवींद्र पितांबर वाकळे -218, हासिम मुस्ताक शेख-158 , दत्तात्रय वामन सूर्यवंशी-192 , बिपीनचंद्र शिवाजी सोनवणे -501 यांना मते मिळाले. यात सर्वच लोकमान्य पॅनलचे उमेदवार मोठ्या मतांनी विजयी झाले आहेत.

धुळे व नंदुरबार जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी बँकेच्या निवडणुकीचा मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली. या निवडणुकीत रिंगणातील 33 उमेदवार आपले भाग्य आजमावत होते. त्यांच्या भाग्याचा फेसला बँकेच्या 21 संचालक पदांच्या निवडणुकीसाठी गेल्या फेब्रुवारी महिन्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता.

यात पहिलेच चार उमेदवारांची बिनविरोध निवड झाली होती. त्यात ओबीसी मतदार संघातून रमेश रघुनाथ देसले, नाशिक जिल्हा सर्वसाधारण मतदार संघातून किरण बोरसे, जळगाव जिल्हा मतदार संघातून भूपेंद्र बाविस्कर, भटक्या विमुक्त जाती जमाती व विशेष मागास वर्गातून प्रकाश बच्छाव या चार संचालकांची बिनविरोध निवड झाली होती. उर्वरित 17 जागांसाठी निवडणूक झाल्याने 23 सदस्य रिंगणात होते.

निवडणुकीत फक्त एकमेव लोकमान्य पॅनल देण्यात उभे होते. शिवाय इतर अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी केली होती. यातच विरोधातील सहा सदस्यांपैकी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली होती. तसेच पत्रक निवडणूक निर्णय अधिकार्यांना दिल्यामुळे ग.स बँकेची निवडणूक एकतर्फी होण्याची चिन्हे निर्माण झाली होती. परंतू निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर त्यात बदल झाला नाही. तसेच लोकमान्य पॅनलचे गटनेते निशांत रंधे व रवींद्र खैरनार यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला होता. या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात प्रगती पॅनल आणि लोक एकत्र येऊन एकच पॅनल तयार केले होते.

सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. मतमोजणीसाठी एकूण 17 टेबल लावण्यात आले होते. प्रत्येक टेबलवर दोन मत पेट्या उघडण्यात आल्या. त्यासाठी प्रत्येक टेबलवर चार कर्मचारी नियुक्त केले होते. मतमोजणीचा कामासाठी एकूण शंभर अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सोपान शिंदे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मनोज चौधरी यांनी प्रयत्न केले.

लोकमान्य पॅनलचे गटप्रमुख व बँकेचे माजी चेअरमन निशांत रंधे व रवींद्र खैरनार यांनी गेली अनेक वर्षे बँक व सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले. सभासदांचा जास्त लाभ झाला पाहिजे, अशी भुमिका होती. लोकमान्य पॅनलच्या माध्यमातून दिलेले सर्वसामान्य उमेदवार व सर्वसमावेशक, बँकेच्या हिताचा जाहीरनामा ही जमेची बाजु ठरली. त्यामुळे प्रचाराला कमी वेळ मिळाला तरी एकंदर वातावरणावरुन विजय निश्चितच झाला होता. प्राथमिक, माध्यमिक शिक्षक,कनिष्ठ-वरीष्ठ महाविद्यालय संघटना, आश्रमशाळा, कृषी विभाग, आरोग्य विभाग, पंचायत समिती, बांधकाम विभाग, पाटबंधारे, अभियांत्रिकी कर्मचारी, बालविकास प्रकल्प, अभियंता संघटना, आय.टी.आय संघटनांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकार्यांसह संघटनांचे सभासद,मतदारांनी लोकमान्य पॅनलच्या सर्व उमेदवारांना बहुमताने निवडुन देण्याचे आश्वासन पाळले.

लोकमान्य पॅनलवर विश्वास दर्शवुन विजयश्री मिळवुन दिल्यामुळे सर्व मतदारांचे गटनेते निशांत रंधे, रविंद्र खैरनार तसेच संजय पवार, विजयराव दहीते, दत्तात्रय शिंदे, सुरेश भावसार, भगवंत बोरसे, एन.डी.नांद्रे, पुखराज पाटील, रामराव पाटील, राजेंद्र भामरे, आर.व्ही.पाटील, विनोद खैरनार, मनोहर शिंदे, मोहन बिस्नारीया, सतिश पाटील, गणेश पाटील, देवरे सर नाशिक, राजेंद्र पाटील, शरद सुर्यवंशी, जितेंद्र बाविस्कर व सर्व पदाधिकार्यांनी आभार मानले आहे.