महापालिकेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना पदोन्नती द्या !

कर्मचारी-अधिकार्‍यांचे आयुक्तांना निवेदन
महापालिकेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना पदोन्नती द्या !

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

महापालिकेतील अधिकारी व कर्मचार्‍यांना त्यांच्या पात्रता व गुणवत्तेनुसार पदोन्नती देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी कर्मचारी व अधिकार्‍यांनी केली आहे.

याबाबत अतिरिक्त आयुक्त गणेश कापडणीस यांना निवेदन दिले. यात म्हटले आहे की, महापालिकेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांच्या हक्काबाबत प्रशासनाची सकारात्मक भूमिका राहिली आहे.

सातवा वेतन आयोग, कालबध्द पदोन्नती, म्युन्सीपल फंडातील कर्मचार्‍यांना कायम करणे, हद्दवाढ व रोजंदारी कर्मचार्‍यांची प्रश्न, रोजंदारी कर्मचार्‍यांची दरवाढ व नियमित पगार हे शक्य झालेे आहे. सद्य:स्थितीत महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांना त्यांची पात्रता व गुणवत्तेनुसार पदोन्नती देण्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनामार्फत शासनाला पाठवावा.

तथापी प्रशासनाच्या सकारात्मक व प्रशासकीय कार्यवाहीत वारंवार निर्माण झालेल्या कास्ट्राईल कर्मचारी महासंघाचा अडथळा निर्माण करण्याचा जाणीवपुर्वक प्रयत्न केला जात आहे. या संघटनेत महापालिका स्तरावरील मोजके कर्मचारी असून अन्य सर्व बाहेरील व्यक्ती आहेत.

प्रशासनाबाबत सातत्याने तक्रारी करुन अधिकार्‍यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न संघटनेमार्फत केला जात आहे. सदर संघटनेशी महापालिकेच्या अधिकारी कर्मचार्‍यांचा दुरान्वये संबंध नाही असे निवेदनात म्हटले आहे.

निवेदनावर कैलास शिंदे, सी.एम.ओगले यांच्यासह 141 अधिकारी व कर्मचार्‍यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com