शिरपूर - Shirpur - प्रतिनिधी :

शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या गरताड गावाजवळ बारा चाकी ट्रॅकने अचानक पेट घेतला.

टायर फुटल्यामुळे ही घटना घडल्याचे सांगितले जाते. यात सुदैवाने मनुष्यहानी झाली नाही. महापालिका अग्नीशामक दलाचे तीन बंबांच्या साहाय्याने आग विझवण्यात आली.दरम्यान यावेळी बघ्यांनी एकच गर्दी केली होती.

चाळीगसावकडून धुळ्याच्या दिशेने प्लॅस्टीकचे दाणे घेवून येणार्या ट्रकला सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास गरताडनजीक आग लागली.

चालकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने ट्रक रस्त्याच्या कडेला थांबवून अग्नीशमन विभागाला माहिती दिली. ट्रकमध्ये प्लॅस्टीकचे दाणे असल्यामुळे आगीने भडका घेतला.

आगीच्या ज्वाळा पाहुन ग्रामस्थ धावून आले. यामुळे गावात भितीचे वातावरण पसरले होते. घटनेमाहिती माहिती मिळताच अग्नीशमन विभागाचे बंब दाखल झाले.

तसेच मोहाडी पोलिस ठाण्याचे पोकाँ प्रविण पाटील व चालक ए.ए.शेख हे देखील घटनास्थळी पोहोचले. दोन ते तीन बंबानी पाण्याचा मारा करत आग विझविली.

मात्र आगीत ट्रक जळुन खाक झाला. त्यात लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.

अतुल पाटील, पांडुरंग पाटील, श्याम कानडे, अमोल सरगर या अग्निशामक विभागाच्या कर्मचार्यांनी त्याठिकाणी आगीवर नियंत्रण मिळवून मोठी जीवित हानी टाळली. यामुळे ग्रामस्थांनी मोठ्या दुर्घटनेपासून वाचल्याचा निःश्वास सोडला. या घटनेमुळे बघ्यांची मोठी गर्दी झाली. सरपंच उपसरपंचही उपस्थित होते. घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.