मनसेतर्फे धुळे मनपा आयुक्तांना कचरा भेट

दखल न घेतल्यास आंदोलन करणार!
मनसेतर्फे धुळे मनपा आयुक्तांना कचरा भेट

धुळे Dhule| प्रतिनिधी

शहरात कचरा संकलन Garbage collection होत नसल्यामुळे सर्वत्र अस्वच्छता आहे. त्यामुळे साथीचे आजार पसरत आहेत. याकडे आयुक्तांनी लक्ष द्यावे. या मागणीसाठी आयुक्तांना मनसेतर्फे कचरा भेट Garbage gift from MNS देण्यात आला. आता तरी दखल घ्यावी, अन्यथा मनसे आंदोलन agitation तिव्र करेल, असा इशारा यावेळी आयुक्तांना देण्यात आला.

मनसेतर्फे पंधरा दिवसांपूर्वी शहरातील कचरा संकलनासाठी घंटागाडी नियमित येत नाहीत. या संदर्भात निवेदन दिले होते. तक्रार देखील केली होती. परंतू त्याची दखल घेण्यात आली नाही. व लवकरात लवकर यावर उपाययोजना न झाल्यास महापालिकेला जबाबदार धरण्यात येईल. असा इशारा दिला होता.

परंतु अधूनमधून घंटागाडी कचरा संकलन करीत होते. ते आता पूर्णपणे बंद झाले आहे. जनतेला शहरात सर्वत्र साचत असलेल्या कचर्‍यामुळे अनेक साथीच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. याला महापालिका प्रशासन व कर्मचारी जबाबदार आहेत. परंतु आयुक्त दखल घेत नाहीत. त्यामुळे कचराच आयुक्तांना भेट देण्यात आला.

आता तरी दखल घ्यावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा मनसेने दिला आहे. यावेळी संतोष मिस्तरी, प्रशांत तनेजा, राजेंद्र दुसाणे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com