आर.टी.ओ.कार्यालय इमारत बांधकामासाठी 11 कोटींचा निधी मंजूर

आ. कुणाल पाटील यांनी दिली माहिती, वाहनधारकांची गैरसोय होणार दूर
आर.टी.ओ.कार्यालय इमारत बांधकामासाठी 11 कोटींचा निधी मंजूर

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

धुळे जिल्हा आर.टी.ओ. कार्यालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठी महाविकास आघाडी शासनाकडून 11 कोटी 99 लक्ष रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला असून या कामासाठी वेळोवेळी अधिवेशनात आवाज उठविण्यात आला होता.

तसेच त्याबाबत परिवहन खात्याकडे वारंवार पाठपुरावा केल्यामुळे इमारत बांधकामासाठी निधी मंजुर करुन दिला असल्याची माहिती आ.कुणाल पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे जिल्हयातील वाहनधारकांची होणारी गैरसोय दूर होणार असून वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले आहे.

धुळे जिल्हयाचे प्रादेशिक परिवहन कार्यालय हे गेल्या अनेक वर्षापासून भाड्याच्या इमारतीत कार्यरत होते.शासनाचे भाड्यापोटी आर्थिक नुकसान होत होते. मात्र वाहनधारकांची संख्या दिवसेंदिवस वाढल्याने ही जागा अपूर्ण पडू लागली. त्यामुळे आर.टी.ओ. कार्यालयाची स्वतःची इमारत असावी म्हणून प्रादेशिक कार्यालयाच्या अधिकार्‍यांनी आ.कुणाल पाटील यांच्याकडे सन 2014 पासून पाठपुरावा केला होता .

त्यानुसार आ.कुणाल पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांच्यासमवेत बैठक घेवून सदर इमारतीचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्यानुसार सा.बां.वि. धुळे यांनी 19 कोटी 6 लक्ष 82 रु.रक्कमेचा प्रस्ताव मंत्रालयात सादर केला होता.त्यापैकी 11 कोटी 99 लक्ष रुपये शासनाने मंजुर केले आहेत. आ.कुणाल पाटील यांचा यासाठी सतत पाठपुरावा सुरुच होता. शिवाय अधिवेशनात इमारतीला निधी मिळावा म्हणून मुद्दा उपस्थित केला होता.

तसेच तत्कालिन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडेही पाठपुरावा केला होता. तसेच विद्यमान परिवहन मंत्री ना.अनिल परब यांचीही भेट घेवून यांची भेट घेवून आर.टी.ओ.कार्यालयाच्या इमारतीसाठी निधी देण्याची मागणी आ.कुणाल पाटील यांनी केली होती. सन 2018 मध्ये आर.टी.ओ. इमारत बांधकामासाठी 19 कोटी खर्चाचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मात्र अंदाजपत्रकाची किंमत 15 कोटीपेक्षा जास्त असल्याने प्रस्तावित इमारतीच्या क्षेत्रफळानुसार नकाशे तयार करुन दि. 20 सप्टेंबर 2019 रोजी सुधारीत प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला होता. गेल्या दोन ते तीन वर्षापासून मंत्रालयात प्रलंबित प्रस्तावाच्या मंजुरीसाठी पाठपुरावा करुन सदर प्रस्तावास मान्यता देवून निधी मंजुर करण्यात आला आहे.

गुरुव्दाराजवळील भाडयाच्या इमारतीत सुरु असलेल्या आर.टी.ओ. कार्यालयात नोंदणीसाठी वाहनधारकांना जावे लागते तर पासींगसाठी कुंडाणे (वरखेडी) फाटा येथे जावे लागत असते. त्यामुळे वाहनधारकांचा वेळ व पैसाही वाया जातो तसेच त्यांना छोट्याछोट्या कामासाठी हेलफाटे मारावे लागत होते. त्यामुळे आर.टी.ओ. कार्यालयाचे सर्व प्रशासकिय काम एकाच इमारतीत व्हावे म्हणून कुंडाणे फाटा येथे इमारत बांधकामासाठी निधी मिळावा अशी मागणी आ.कुणाल पाटील यांनी वारंवार पाठपुरावा केला होता. याकरीता त्यानुसार विद्यमान महाविकास आघाडीच्या शासनाने धुळे आर.टी.ओ.कार्यालयासाठी एकूण 11 कोटी 99 लक्ष 78 हजार रुपयांचा निधी मंजुर केला आहे. याबाबत दि.20 मे रोजी शासन निर्णय काढला असल्याचे आ.कुणाल पाटील यांनी सांगितले आहे. आ.कुणाल पाटील यांनी प्रयत्न करुन कुंडाणे फाटा येथे इमारातीसाठी निधी मिळवून दिल्याबद्दल जिल्हयातील वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com