धुळे : गुड्डया खूनप्रकरणातील फरार आरोपी आयता जाळ्यात
धुळे

धुळे : गुड्डया खूनप्रकरणातील फरार आरोपी आयता जाळ्यात

कोरोना पॉझिटिव्ह असल्याने सर्वोपचार रूग्णालयात उपचार, बरे होण्याची पोलिस बघताय वाट

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

धुळे - Dhule :

देशभरात गाजलेल्या येथील गुंड गुड्डया खूनप्रकरणातील फरार आरोपी आयता पोलिसांच्या जाळयात आला आला आहे. त्यांच्यावर हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह म्हणून उपचार सुरू आहेत. पोलिस त्यांच्यावर लक्ष ठेवून असून प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्याला अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली.

शहरातील पारोळा रोडवर पिस्तुलने गोळी झाडत व तलवारीने हल्ला करत कुख्यात गुंड रफियोद्दीन शेख उर्फ गुड्या याचा खुन करण्यात आला. ही घटना दि. 18 जुलै 2017 रोजी पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास घडली होती,घटनेनंतर आरोपी फरार झाले होते.

मात्र घटना जवळील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली होती. त्यात आरोपी स्पष्ट दिसून येत होते. तसेच हे फुटेल सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने ही घटना देशभरात चर्चेचा विषय ठरली होती. घटनेनंतर पोलिसांनी काही दिवसात सर्व फरार आरोपींना अटक केली. मात्र एक संशयीत आरोपी फरारच होता. आतापर्यंत त्याचा शोध लागला नव्हता.

दरम्यान तो गेल्या आठ दिवसांपासून हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना पॉझिटिव्ह म्हणून उपचार घेत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे घटेनपासून फरार असलेला आरोपी आयता पोलिसांच्या जाळ्यात आला आहे. पोलिस त्यांच्यावर लक्ष ठेवून असून तेथे पोलिस बंदोबस्त देखील लावण्यात आला आहे. दरम्यान या फरार संशयीत आरोपीला डिस्चार्ज दिल्यानंतर अटक करण्यात येणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com