धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शहरातील विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये मोफत लसीकरण केंद्र सुरु केल्यामुळे हॉस्पिटलच्या वैद्यकीय प्रमुखांचा महापालिकेतर्फे सत्कार करण्यात आला.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात करोनाची आकडेवारी वाढत आहे. त्यामुळे लसीकरण वाढवण्यावर भाजपा महानगरप्रमुख अनुप अग्रवाल, महापौर चंद्रकांत सोनार, आयुक्त अजिज शेख यांनी भर दिला आहे.

त्यामुळे विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये मोफत लसीकरण केंद्र सुरु केले आहे. या आपत्तीच्या काळात केलेल्या सहकार्याबद्दल विघ्नहर्ताचे वैद्यकीय प्रमुख डॉ. यतीन वाघ व डॉ. योगेश झाडबुके यांचा सत्कार जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी, उपायुक्त शिल्पा नाईक, सहाय्यक आयुक्त शांताराम गोसावी, विनायक कोते, आरोग्य अधिकारी डॉ. महेश मोरे, प्रभारी नगरसचिव मनोज वाघ, सामाजिक कार्यकर्ते छोटू थोरात, भिकन वराडे, डॉ. प्रशांत पाटील, नगरसेवक राजेश पवार आदी उपस्थित होते.