स्टील खरेदीत 14 लाखात फसवणूक

चौघांविरुध्द गुन्हा दाखल
स्टील खरेदीत 14 लाखात फसवणूक

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

धुळ्यातील अवधान एमआयडीसीतील जैन ट्रेडींग कंपनीतून स्टील खरेदीत भवरलाल जैन रा. उरसगाव यांची 14 लाखात फसवणूक झाल्याचे उघडकीस आले.

या प्रकरणी मोहाडी पोलिस ठाण्यात चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.

याबाबत कमिशन एजंट संजय शर्मा यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शर्मा यांच्यासह त्याचा सहकारी अब्दुल बारीक यांनी धुळ्यातील अवधान एमआयडीसीतील जैन ट्रेडींग कंपनीतून 14 लाख चार हजार 766 रुपयांचे 12 टन 970 किलो भंगार स्टीलमाल कमिशन तत्वावर स्कायटेक रोलिंग मिल प्रा.लि. उसरगाव कंपनीचे मालक भवरलाल जैन यांच्यासाठी खरेदी केले होते.

25 नोव्हेंबरला सकाळी हा व्यवहार झाला होता. खरेदी केलेल्या मालाचे ऑनलाईन पेमेंट अदा करावयाचे असल्याने शर्मा याच्या सोबत इतर स्टीलमाल खरेदी करण्यासाठी असणारे अन्वर त्याच्या सोबत असलेला एक जण यांनी स्टीलमाल विक्री करणार्‍या मालकाच्या बँक खाते न देता त्यांनी जय माताजी ट्रेडर्स खाते नंबरचे खातेधारक महेशकुमार वर्डे यांच्या बँक खात्याची डिटेल्स दिले. या बँक डिटेल्सवर भवरलाल जैन यांनी खरेदी केलेल्या स्टीलच्या मालाची रक्कम अदा केली.

ही रक्कम संशयीत महेशकुमार वर्डे यांनी बँक ऑफ महाराष्ट्र नारापोली (भिवंडी) शाखेतून शहाबुद्दीन एम खान याच्या मदतीने चौघांनी संगनमत करुन परस्पर काढून घेतली. आणि शर्मा व त्यांचे मालक भवरलाल जैन यांची फसवणूक केली.

त्यांच्या फिर्यादीवरुन भादंवि 406, 420, 324 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी महेशकुमार वर्डे याला ताब्यात घेतले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com