लग्नास नकार देवून फसवणूक, 12 जणांवर गुन्हा

लग्नास नकार देवून फसवणूक, 12 जणांवर गुन्हा

धुळे । दि.16। प्रतिनिधी

लग्नास नकार देवून फसवणूक केल्याप्रकरणी मुलासह 12 जणांवर पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत दिलभर बापु पारधी (वय 45 रा. नकाणे ता. धुळे) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्यांच्या मुलीचे लग्न हरेश छगन साळुंके (रा. जयनगर, शहादा जि. नंदुरबार) यांच्याशी ठरले होते. मात्र नंतर हरेश व त्यांच्या घरच्यांनी मुलीशी लग्न करण्यास नकार देवून त्यांची फसवणूक केली.

तसेच फोनव्दार दिलभर यांना जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानुसार हरेश साळुंकेसह छगन साहेबराव साळुंके, बायजाबाई छगन साळुंके, राकेश छगन साळुंके, पुजा राकेश साळुंके, मोहन देवराव साळुंके सर्व (रा. जयनगर), मुकेश चव्हाण, शितल मुकेश चव्हाण (रा. अमळनेर), संजय चव्हाण, सुनंदा संजय चव्हाण (रा. रामपुरा, चोपडा), निकु, पंकज कैलास पाटील (रा. मामलदे ता. चोपडा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तपास एएसआय पोतदार करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com