जनरेटर चोरणारे चौघे तरूण गजाआड
धुळे

जनरेटर चोरणारे चौघे तरूण गजाआड

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शिंदखेडा तालुक्यातील रेल्वे बेटावद शिवारात रेल्वे बोगद्याच्या कामावरील जनरेटर चोरीचा गुन्हा नरडाणा पोलिसात उघडकीस आणाला आहे. चौघांना अटक केली असून त्यांच्याकडून जनरेटर हस्तगत करण्यात आले आहे.

बेटावद रेल्वे स्टेशनच्या पुर्वेला एक कि.मी. अंतरावर रेल्वे बोगद्याचे काम चालू आहे. हे सुरत येथील शिव इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीकडून सुरू आहे. या कामावर असलेले 45 हजार रुपये किंमतीचे 9 हॉर्सपॉवर क्षमतेचे जनरेटर दि. 14 जानेवारी 2020 रोजी अज्ञात चोरटयांनी लंपास केले होते. याबाबत कंपनीचे सुरपरवायझर नरेशभाई भिराभाई बायानी (ह.मु अमळनेर) यांच्या फिर्यादवरुन नरडाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हा गुन्हा सराईत गुन्हेगारांनी नियोजनबध्द केला असल्याचा संशयावरुन पोलिसांनी बेटावद, अजंदे बुद्रूक व कळंबु (ता. अनळनेर) परिसरात चोरट्यांचा शोध सुरू केला. त्यादरम्यान हा गुन्हा पवन नामदेव कोळी (रा. अजंदे ता. शिंदखेडा) याने त्याच्या साथीदारांसह केला असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी त्या तरूणाला ताब्यात घेवून चौकशी केली. त्याने हा गुन्हा त्याचे साथीदार अजय शांताराम कोळी (रा. बेटावद), दीपक अशोक परदेशी (रा. अजंदे बु) व संदीप भगवान कोळी (रा. कळंबू) यांनी केल्याचे स्पष्ट झाले.

त्यांनी चोरी केलेले जनरेटर त्यांनी सिंधा (ता.नंदूरबार) येथे विक्री करण्याकरीता लपवून ठेवल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानुसार चौघांना अटक करुन त्यांच्याकडून चोरी झालेले जनरेटर हस्तगत करण्यात आले आहेत.

चौघांनी अशाच प्रकारे इतर कुठे गुन्हे केले आहेत का, याचा पोलिसांनी शोध सुरू केला आहेत.ही कारवाई पोलीस अधिक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधिक्षक राजू भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी अगिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि योगेश राजगुरु, पोहेकॉ लादूराम चौधरी, संजय धनगर व शशी कोळी, गोरख चौधरी, निलेश पाटील यांनी केली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com