ट्रकमधून पावणे चार लाखांचा मुद्देमाल लंपास
धुळे

ट्रकमधून पावणे चार लाखांचा मुद्देमाल लंपास

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

साक्री तालुक्यातील पिंपळनेर शिवारातील एका पेट्रोलजवळ उभ्या ट्रकमधून चोरट्यांनी पावणे चार लाखांचे प्लॅस्टीक दोरीचे बंडल व इतर साहित्य लंपास केले आहे. याप्रकरणी पिंपळनेर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत ट्रक चालक पोन्नुसामी के कालीयानंद (रा.रेडीपट्टी जि.नामक्कल, तामिळनाडू याने पिंपळनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तो पिंपळनेर गावातील महाराष्ट ऑटो मोबाईल पेट्रोलपंप येथे दि. 12 रोजी रात्री 11 वाजेला माल घेवू जात असलेला ट्रक उभा करुन थांबला होता.

तो झोपलेला असतांना अज्ञात चोरट्यांनी एक दुसरे वाहन ट्रकला रिव्हर्स लावून त्याच्या ट्रकमधील पिवळ्या रंगाचे प्लास्टीक दोरीचे 48 बंडल, शांतीस चोको फेलेस फुड आयटम असलेले 14 बॉक्स आणि ट्रॅक्शन सिस्टीम पुली नावाची मशिनचे 26 नग बॉक्स असा एकुण 3 लाख 79 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com