धुळ्यातील बांधकाम भवनातून चार लाखांची रोकड लंपास

धुळ्यातील बांधकाम भवनातून चार लाखांची रोकड लंपास

धुळे । प्रतिनिधी Dhule

शहरात चोरी घरफोडीच्या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. काल भरदुपारी साक्री रोडवरील बांधकाम भवनाच्या आवारात उभ्या दुचाकीच्या डिक्कीतून चोरट्याने 3 लाख 80 हजारांची रोकड लंपास केली आहे.

या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी (City Police) शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांधकाम व्यावसायीक योगेश मोतीराम येवले (वय 35 रा. 59, तिरूपती नगर, देवपूर, धुळे) यांनी शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, ते काल बांधकाम भवनात आले होते. दुपारी बारा वाजे दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या दुचाकीच्या (क्र. एमएच 18 बीबी 0662) डिक्कीचे लॉक तोडून त्यातील 3 लाख 80 हजारांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी शहर पोलिसात अज्ञात चोरट्यावर गुन्हा नोंद झाला असून तपास पोहेकाँ गायकवाड करीत आहेत.

Related Stories

No stories found.