धुळे : रोकडसह सव्वा चार लाखांचा गांजा जप्त
धुळे

धुळे : रोकडसह सव्वा चार लाखांचा गांजा जप्त

फरार शोभा डॉनविरूध्द गुन्हा

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

धुळे - Dhule

शहरातील साक्री रोडवरील मोती नगरात राहणार्‍या शोभा डॉन या महिलेच्या घरी काल पुन्हा पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली. घरातून 3 लाख 82 हजार 350 रूपयांचा 70 किलो ओला गांजा व 45 हजार रूपयांची रोकड असा एकुण 4 लाख 27 हजारांचा मुद्येमाल जप्त केला. पंरतू महिला फरार झाली. याप्रकरणी रात्री उशिरा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर पोलिसांच्या पथकाने काल दि. 9 रोजी दुपारी 2.45 वाजेच्या सुमारास साक्री रोडवरील मोती नाल्या किनारी मोती नगरात राहणार्‍या शोभा डॉन नामदेव साळुंके (वय 50) याच्या घरी छापा टाकला. मात्र कारवाईआधीच शोभा डॉन ही फरार झालेली होती.

पोलिसांनी घराची तपासणी केली असता घरात 3 लाख 82 हजार 350 रूपये किंमतीचा 70 किलो 450 ग्रॅम वजनाचा ओला गांजा व 45 हजार 200 रूपयांची रोकड मिळून आली. गांजा व रोकड असा एकुण एकुण 4 लाख 27 हजारांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी पोहेकाँ विलास भामरे यांच्या फिर्यादीवरून शोभा डॉनविरोधात एनडीपीएस अ‍ॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष तिगोटे हे करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com