साक्रीचे माजी आमदार योगेंद्र भोये यांचे करोनाने निधन

साक्रीचे माजी आमदार योगेंद्र भोये यांचे करोनाने निधन

पिंपळनेर - Pimpalner - प्रतिनिधी :

साक्री तालुक्याचे माजी आमदार योगेंद्र रेश्मा भोये यांचे दि. 5 मे रोजी कोरोनाने नासिक येथे उपचार घेतांना 8.15 वाजता निधन झाले.

भाऊ अनिलच्या निधनानंतर काही दीवसातच ही दुखःद घटना घडली.ते धुळे जिल्ह्याचे कै.खा.रेश्मा मोतिराम भोये यांचे चिरंजीव व माजी कृषी सभापती शिवाजी भोये यांचे बंधू होत.

अतिशय सालस,निगर्वी व मोठ्या मनाचा, भ्रष्टाचाराचा लवलेश नसलेले, सतत सहकार्य करणारे, निसर्ग प्रेमी भाऊचे निधन झाल्यामुळे तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. ते कुडाशी येथिल संजय गांधी विद्यालयाचे चेअरमन होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com