पालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी शहराचा आढावा घेतांना..
पालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी शहराचा आढावा घेतांना..
धुळे

दोंडाईचा : पाच दिवस जनता कर्फ्यू

प्र. मुख्याधिकारी देवेंद्रसिंग परदेशी यांची माहिती ; विना मास्क फिरणार्‍यांना दंड

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

Dhule - Dondaicha - दाेंंडाईचा - श.प्र :

पालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी यांनी आज सकाळी शहराचा आढावा घेतला. तेव्हा शहरात बिनधास्त वातावरण झालेले दिसून आले. त्यात अनेकांनी माक्स न लावलेले नव्हते. तर अनेक दुकाने, हॉटेलमध्ये गर्दी दिसून आली. अशांवर दंडात्मक कार्यवाही पालिकेच्या वतीने करण्यात आली आहे. दरम्यान शनिवार दि. 18 पासून शहरात पाच दिवस स्वयंस्फूर्तीने जतना कर्फ्यू लावण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी देवेंद्रसिंग परदेशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शहरासह परिसरात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता दोंडाईचा नगरपालिकेचे नुकतेच आलेले प्रभारी मुख्याधिकारी देवेंद्रसिंग परदेशी यांनी येताच शहरात विना मास्क बिनधास्तपणे वावरणार्‍या नागरिकांना धडक कारवाई मोहीम राबवली. दुचाकीवर माक्स न लावणार्‍यांना प्रत्येकी 100 रुपये दंड आकारण्यात आला. तर शहरातील हॉटेल गोपाल येथे हॉटेलमध्ये नियमांचे पालन न करता 10 ते 15 जण नास्ता करतांना दिसून आल्याने 2 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

दोंडाईचा नगरपालिकेच्या आवारात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलतांना मुख्याधिकारी श्री.परदेशी म्हणाले की, शहरात भाजीपाला मार्केट, कपडा व्यवसाय दुकानात, किराणा दुकानात नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी करीत आहे. नागरिक कोरोनाचा वाढता धोका लक्षात घ्यायला तयार नाहीत. जसे काय दोंडाईचातून कोरोना नष्ट झाल्याचे चित्र आज शहरात गस्त घालतांना दिसून आले. त्यामुळे सोशल मिडीयातून देखील वारंवार जनता कर्फ्यूची मागणी होत होती. त्यामुळे दि. 18 जुलैपासून पाच दिवसांकरिता दोंडाईचा शहरात स्वयंशिस्त पाळण्यासाठी जनता कर्फ्यू ठेवण्यात येत असल्याबाबत त्यांनी सांगितले.

या काळात शहरात मेडिकल व रुग्णालय उघडे राहतील. याव्यतिरिक्त सर्वच कडकडीत बंद ठेवण्यात येईल. त्यामुळे कोरोना विषाणू आजाराची साखळी तोडण्यात मोठी मदत होणार आहे. शिंदखेडा येथे सदर प्रयोग यशस्वी झाला असून हाच प्रयोग दोंडाईचा शहरात राबविण्यात येणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या काळात बेशिस्तपणे वागणार्‍यांवर पोलिसांमार्फत कारवाई केली जाईल, अशा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी अप्पर तहसीलदार सुदाम महाजन, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड, संतोष लोले, शिंदखेडा कोविड सेंटरचे प्रमुख डॉ. हितेंद्र देशमुख, दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अर्जुन नरोटे आदी उपस्थित होते.

तर गुन्हे दाखल करणार

व्यापार्‍यांनी नियमांचे पालन न केल्यास गुन्हे दाखल करु, अशी तंबीही प्र. मुख्याधिकारी देवेंद्रसिंग परदेशी यांनी दिली. व्यापार्‍यांनी ग्रामीण भागातून येणार्‍या ग्राहकांना माक्स लावण्यासह इतर नियम अंमलात आणण्याचे सांगावे. तसेच भाजीपाला व फळ विक्रेत्यांनी ठरवून दिलेल्या जागेवरच विक्री करावी. मानराज गल्लीसह जुनी भाजीपाला गल्ली लावतांना आढळून आले तर दंडात्मक कार्यवाहीला सामोरे जावे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Deshdoot
www.deshdoot.com