धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शिंदखेडा तालुक्यातील वारूळ येथे शेतातील खळ्यांना आग लागल्याची घटना काल दुपारी घडली.

त्यात चार्यासह शेतीपयोगी साहित्य जळून खाक झाले. आगीत सुमारे 10 ते 12 लाखांचे नुकसान झाले असून याबाबत नरडाणा पोलिसात अग्नी उपद्रवाची नोंद झाली आहे.

वारूळ गाव शिवारातील वारूळ ते बेटावद रस्त्यावरील दत्तात्रय गजानन मोरे यांच्या खळ्याजवळ काल दि. 30 रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास अचानक आग लागली.

चार्यामुळे काही वेळातच आगीने रौद्र रूप घेतले. त्यामुळे शेतातील 12 ते 15 खळ्यांनाही आग लागून खळ्यातील चारा, शेतीपयोगी साहित्य, सरपण, पत्रटीशेड, धान्य जळून खाक झाले.

त्यात सुमारे 10 ते 12 लाखांचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण समजु शकलेले नाही. याबाबत पोलिस पाटील जितेंद्र बेहेरे यांच्या माहितीवरून नरडाणा पोलिसात नोंद झाली आहे. पोना बोरसे चौकशी करीत आहेत.