धुळे | प्रतिनिधी Dhule

शहरातील स्टेशन रोडवरील शनि मंदिरामागे असलेल्या बारदानच्या गोडावूनला आज सकाळी अचानक आग लागली. त्यात होरपळून गोडावून मालकासह मजुराचा मृत्यू झाला.

जयवंत बाळकृष्ण पाखले (वय ४५ रा. पार्वती नगर, धुळे) असे गोडावून मालक व मजुर अनिल पाटील अशी दोघा मयतांची नावे आहेत. आग लागल्यानंतर त्यांनी गोदामातील बारदान वाचविण्यासाठी बाहेर फेकत असतांनाच ते आगीच्या लपेट्यात सापडले.

माहिती मिळताच घटनास्थळी अग्नीशमनबंब तसेच परिसतील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, शहर पोलिस दाखल झाले. गोडावूनची भिंत फोडून दोघांना बाहेर काढण्यात आले. पंरतू दोघांचा होरपळून व गुदमरून मृत्यू झालेला होता. घटनेमुळे हळहळ व्यकत होत आहे.