वडील रागवल्याने मुलाने घेतला गळफास

वडील रागवल्याने मुलाने घेतला गळफास

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

मोबाईलवर जास्त वेळ गेम खेळू नको, असे वडीलांनी रागावल्याचा राग येवून मुलाने थेट गळफास घेवून आत्महत्या केली. काल दुपारी ही धक्कादायक घटना घडली.

ओम राजेंद्र झांबरे (वय 18 रा. गल्ली नं. 4, राजकलम चित्र मंदिराच्या मागे, धुळे) असे मयताचे नाव आहे. तो काल सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घरात मोबाईलवर गेम खेळत होता. तेव्हा वडील राजेंद्र झांबरे यांनी त्याला मोबाईलवर जास्त वेळ गेम खेळू, असे सांगत रागावले.

त्याचा राग येवून त्याने घराच दरवाजा बंद करून छताच्या कडीला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. त्याला गल्लीतील लोकांच्या मदतीने खाली उतरवून जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता डॉ. कपील पावरा यांनी तपासणी करून मृत घोषित केले.

याबाबत राजेंद्र झांबरे यांच्या माहितीवरून आझादनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोहेकाँ एस. के. सुर्यवंशी करीत आहेत. घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान ओम हा घराचा एकुलता होता. तो देवपूरातील महाविद्यालयात बारावी कॉमर्सचे शिक्षण घेत होता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com