धडगावच्या शेतमजुर कुटूंबावर काळाचा घाला

ट्रकच्या धडकेत पिता-पुत्री ठार, दोघे गंभीर
धडगावच्या शेतमजुर कुटूंबावर काळाचा घाला

धुळे । प्रतिनिधी Dhule

शिंदखेडा (Shindkheda) तालुक्यातील आरावे येथे शेतमजुरी करणार्‍या कुटुंबावर काळाने झडप घातली. दुचाकीने शेताकडे परत येत असतांना त्यांना भरधाव आयशर ट्रकने (Eicher truck) जोरदार धडक दिली. त्यात पित्यासह सहा महिन्यांची मुलगी ठार झाले. तर पत्नीसह मुलगा गंभीर जखमी झाले. मेथी गावानजीक हा अपघात झाला.

अपघातात सुका सुकदेव भिल (वय 35 रा. धडगाव जि. नंदुरबार) त्यांची मुलगी हिना (वय 7) अशी दोघा मयतांची नाव आहेत. सुका भिल हे आरावे (ता.शिंदखेडा) येथील कोमलसिंग गजेसिंग गिरासे (वय 65 ) त्याचे शेतात परिवारासह राहत होते, शेतमजुरी करुन उदरनिर्वाह करीत होता.

दि.19 रोजी तो पत्नी व दोन मुलांसह कामानिमित्त दुचाकीने दोंडाइचा येथे गेले होता. तेथून आरावे येथे परत येत असतांना सायंकाळी 4.30 वाजेच्या सुमारास मेथी गावाजवळ त्यांचे दुचाकीला भरधाव आयशर ट्रकने (क्र.एम एच 04 जीसी 3560) जोरदार धडक दिली. त्यात चारीही जण गंभीर जखमी झाले. त्यांना त्यांना शेतमालक गिरासे व ग्रामस्थांनी खाजगी वाहनाने हिरे मेडीकल कॉलेज येथे उपचारार्थ दाखल केले. सायंकाळी 7.25 वाजता सुका भील व त्याची मुलगी हिना यांना डॉक्टरांनी तपासणी करून मयत घोषीत केले. याबाबत कोमलसिंग गिरासे यांच्या माहितीवरून शहर पोलिसात (Police) प्रथमदर्शी अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com