मोघण येथे कर्जबाजारी शेतकर्‍यांची आत्महत्या

मोघण येथे कर्जबाजारी शेतकर्‍यांची आत्महत्या

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

मोघण (ता. धुळे) येथे शेतकर्‍याने कर्जबाजारीमुळे गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना काल सायंकाळी उघडकीस आली. याबाबत मोहाडी पोलिसात नोंद झाली.

कैलास ओंकार माळी (वय 50, रा. मोघण ता. धुळे) असे मयत शेतकर्‍याचे नाव आहे. त्यांनी शेतीसाठी बँकेतून कर्ज घेतले होते.

पंरतु, उत्पन्न हाती न आल्याने कर्ज कसे फेडावे, घर कसे धकवावे, या विवंचणेत ते होते. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान काल दि.27 रोजी त्यांनी घरी एकटे असतांना झोक्याच्या दोरीने गळफास घेतला. सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास कुटुंबिय घरी आले तेव्हा कैलास माळी हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले.

त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. याबाबत संदीप कैलास महाजन यांच्या माहितीवरून मोहाडी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्यात पत्नी, दोन मुले, असा परिवार आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com