वाहनाच्या धडकेत शेतकरी ठार

ग्रामस्थांचा रास्तारोको : धावडे येथील घटना
वाहनाच्या धडकेत शेतकरी ठार

दोंडाईचा | श.प्र. Dondaicha

शहरातून जाणार्‍या राज्य महामार्ग क्र. ६ वर आज पहाटे सव्वा पाच वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत धावडे गावातील शेतकरी राजेंद्र लोटन पाटील (वय ५०) हे जागीच ठार झाले.

या घटनेमुळे काही काळ गावात तणावाचे वातावरण होते. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले. अप्पर तहसीलदार सुदाम महाजन यांची घटनास्थळी भेट देत ग्रामस्थांची समजूत काढली. त्यानंतर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यात आली.

तसेच अज्ञात वाहनचालकाचाविरूध्द दोंडाईचापोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रस्त्यावर नेहमी अपघात होत असतात. त्यामुळे तात्काळ गतीरोधक बसविण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com