विजेचा धक्का लागून तरूण शेतकर्‍याचा मृत्यू

विजेचा धक्का लागून तरूण शेतकर्‍याचा मृत्यू

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शिरपूर तालुक्यातील पळासनेर येथे शेतात पाण्याची मोटर सुरु करण्यासाठी इलेक्ट्रीक बोर्डाजवळ गेलेल्या तरुण शेतकर्याचा शॉक लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काल सायंकाळी घडली. घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

राहुल उर्फ गोलु शाम पाटील (वय 23रा. पळासनेर) असे त्याचे नाव आहे. तो काल सायंकाळी शेतात गेला होता. यावेळी शेतात पाण्याची मोटार सुरू करण्यासाठी इलेक्ट्रीक बोर्डला हात लावताच त्याला जोराचा शॉक लागला.

त्याला उपस्थितांनी तत्काळ गावातील रुग्णालयात नेले. मात्र गंभीर परिस्थिती असल्याने शिरपूर इंदिरा गांधी मेमोरियल रुग्णालयात दाखल केले.

तेथून शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषीत केले. राहुल पाटील याचे आठ महिन्यापूर्वीच लग्न झाले होते. सर्व काही व्यवस्थीत सुरु असतांना कुटुंबावर काळाने घावा घातला. राहुल पाटील याच्या पश्चात आई-वडील, भाऊ व बहिण असा परिवार होत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com