पॉडकास्ट : प्रत्येक श्रमिकांची नोंदणी झालीच पाहिजे - मेधा पाटकर

धुळ्यात श्रमिकांशी साधला संवाद
पॉडकास्ट : प्रत्येक श्रमिकांची नोंदणी झालीच पाहिजे - मेधा पाटकर

धुळे । प्रतिनिधी Dhule

लॉक डाऊनमुळे लोक पुन्हा समस्यांचा गर्तेत सापडले आहे. आता सरकारने आपले प्राधान्यक्रम बदलायला हवेत, असे सांगतानाच प्रत्येक श्रमिकाची नोंदणी झालीच पाहिजे, त्यांना सुविधा मिळायलाच हव्यात, अशी मागणी जेष्ठ समाजसेविका मेधाताई पाटकर यांनी केली.

यासाठी 1 मे कामगार दिनाचे औचित्त्य साधून ही मोहीम राबवावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. श्रीमती पाटकर आज धुळ्यात होत्या. त्यांनी रिक्षाचालक, हात गाडीधारक आणि श्रमिकांशी चर्चा केली, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.

त्या नंतर माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, लॉकडाऊनचे परिणाम सगळ्यांनाच भोगावे लागत असले तरी कष्टकऱ्यांना याची मोठी झळ बसत आहे. आतरराज्य मजूर स्थलांतर कायद्यात स्पष्ट तरतुदी आहेत त्यानुसार व्यवस्था व्हायला हवी. प्रत्येक श्रमिकांची नोंद होणे अत्यंत आवश्यक आहे. कामगार दिनाचे औचित्य साधून ही मोहीम राबविली जावी.

कार्पोरेट लॉबीवर ठपका

कोरोनामुळे परीस्थिती बिकट आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण, आदिवासी भागात अवस्था तर फारच खराब आहे, तिथं पर्यंत सुविधा वाढविल्या पाहिजेत. मात्र या संकट काळातही कार्पोरेट लॉबी याचा फायदा घेऊन लूट करत असल्याचा आरोप श्रीमती पाटकर यांनी केला. कॉट आणि इंजेक्शन चा काळाबाजार हे तर खूपच भयानक आहे, असेही त्या म्हणाल्या.

धान्याचे प्रमाण वाढवा

सरकारने लॉक डाऊन काळात गार्जुना 1500 रुपये देऊ केले आहेत. पण एवढ्याने काय होणार? रेशन वर 3 किलो धान्य देणार आहे, त्यापेक्षा 15 किलो धान्य द्या, दोन ते तीन किलो डाळ आणि एक किलो तेल ही द्यावे, अशीही मागणी त्यांनी केली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com