कोविड सेंटरनजीकची अतिक्रमणे हटवली
धुळे

कोविड सेंटरनजीकची अतिक्रमणे हटवली

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शहरातील मालेगाव रोडवरील लोकमान्य हॉस्पीटलनजीक अडथळा ठरणारे अतिक्रमणे आज महापालिकेचे अतिक्रमण निर्मुलन पथकाने काढली.

लोकमान्य हॉस्पीटल हे कोवीड सेंटर म्हणून जाहिर करण्यात आले आहे. या हॉस्पीटल भोवती अतिक्रमण असल्याची तक्रार आ. फारुख शाह यांनी केली होती.

त्याची दखल घेवून आज महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाने हॉस्पीटलच्या तीन बाजूला असलेले खाद्यपदार्थ, फळ विक्रेत्यांच्या हातगाड्या व तात्पुर्ते करण्यात आलेले अतिक्रमण हटविण्यात आले. यामुळे हॉस्पीटमध्ये रुग्णांना पोहचणे आता सहज शक्य होणार आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com