कोविडकाळात अहिंसा पॉलिटेक्निकच्या 207 तरुणांना रोजगार

कोविडकाळात अहिंसा पॉलिटेक्निकच्या 207 तरुणांना रोजगार

दोंडाईचा - Dondaicha - श.प्र :

कोविडकाळात मुंबई, पुणे सारख्या मोठ्या शहरातील अनेक तरुणांना आपला रोजगार गमावून आपल्या गावी माघारी यावे लागले. मात्र याउलट दोंडाईचा शहरातील व्यवसाय् शिक्षण देणार्‍या अहिंसा पाँलिटेक्निकच्या माध्यमातून महाविद्यालयातील तंत्रशिक्षण घेतलेल्या तरुणांना शिक्षणासोबत मोठ्या प्रमाणात नोकरी देऊन रोजगार उपलब्ध करून देण्यात आला.

दोंडाईचा शहरातील वर्धमान शिक्षण संस्थेच्या अहिंसा पॉलिटेक्निकच्या माध्यमातून पुणे येथील कोरोना लस विकसित करणारे सिरम इन्स्टिट्यूट, भारत फोर्ज, अँम्फिनाँल आदी बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या अधिकार्‍यांनी दि. 18 जुलै रोजी अहिंसा तंत्र निकेतन येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

मेकनिकल इंजिनिअरिग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिगच्या पदविका झालेल्या विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलविण्यात आले होते.

अहिंसा पॉलिटेक्निक येथील एकुण 270 तरुणांनी मुलाखती दिल्या यापैकी 207 तरूणांची निवड करून त्यांना नोकरी बाबतचे नियुक्तीपत्र देण्यात आले.

सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी प्राचार्य आर.व्ही.पिंपळे, डी.पी.बडगुजर, डी.आर. हालोरे आदींनी परिश्रम घेतले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com