चिमठाणे ग्रामपंचायतीत अपहार, संरपंचासह दोघांवर गुन्हा

चिमठाणे ग्रामपंचायतीत अपहार,
संरपंचासह दोघांवर गुन्हा

धुळे Dhule। प्रतिनिधी

शिंदखेडा Shindkheda तालुक्यातील चिमठाणे ग्रामपंचायतीत Chimthane Gram Panchayat विविध विकास योजनांच्या कामांसाठी खर्च केल्याचे दाखवून परस्पर सव्वा पाच लाखांचा अपहार fraud करण्यात आला. याप्रकरणी सरपंचासह Sarpanch तत्कालीन ग्रामविकास अधिकार्‍यांवर Rural Development Officers शिंदखेडा पोलिसात गुन्हा Crime in Shindkheda police दाखल झाला आहे.

याबाबत पंचायत समितीचे विस्तार अधिकारी भिमराव गरूड यांनी शिंदखेडा पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सरपंच खंडु वंजी भिल (रा. चिमठाणे) व तत्कालीन ग्राम विकास अधिकारी महेंद्र पंढरीनाथ महिरे यांनी पदावर असतांना सन 2017-18 च्या ग्रामनिधीमधून 29 हजार 510 रूपये व 14 व्या वित्त आयोग 2017-18 मधील 47 हजार 900 रूपये व सन 2019-20 मधील 14 व्या वित्त आयोगमधील रक्कम 4 लाख 56 हजार 936 अशी एकुण 5 लाख 34 हजार 346 रूपयांचा वेळोवेळी वैयक्तीक फायद्याकरीता संगनमताने विविध विकास योजनांच्या कामांसाठी खर्च केल्याचे दाखवून परस्पर शासकीय रक्कमेचा अपहार केला. त्यावरून वरील दोघांवर भादंवि कलम 409, 406 व 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक भाबड करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com