धुळे । प्रतिनिधी Dhule

जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. शनिवारी दिवसभरात नवीन 55 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले.

तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल 80 वर्षीय (रा. कासारे ता.साक्री) वृध्दाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्हात आतापर्यंत एकूण 392 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. भाडणे ता. साक्री सीसीसीमधील रॅपिड अँटीजन टेस्टच्या 2 अहवालांपैकी 1 अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

एसीपीएम लॅबमधील 4 अहवालापैकी 1 व खाजगी लॅबमधील 99 अहवालापैकी 53 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात अधिक धुळे शहरातील रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात बाधितांची एकूण रूग्ण संख्या 15 हजार 123 वर पोहोचली आहे.

दरम्यान नागरिकांनी मास्क, सॅनेटायझरचा वापर करावा. अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.