डांबराचा अवैध कारखाना उद्ध्वस्त
धुळे

डांबराचा अवैध कारखाना उद्ध्वस्त

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

तालुक्यातील तिखी रोडवरील एका शेतात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून डांबर साठवणुकीचा अड्डा उद्ध्वस्त केला. तेथून वाहनासह चार लाखांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

तिखी रोडवरील देवाजी शिंगाडे यांचे शेतात विकास शांताराम शिंगाडे (रा. मोहाडी) याने डांबरची साठवणूक करून ठेवली असल्याबाबतची गुप्त माहिती एलसीबीचे पोलिस निरिक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळाली. त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तेथे छापा टाकला.

घटनास्थळाहून श्रीराम अशोक वयसे, इब्रान आली शौकत अली (रा. मोहाडी ता. धुळे) यांना ताब्यात घेण्यात आले. तसेच तेथून सीलबंद डांबर व केमिकलचे 62 खाली ड्रम, एक टाटा एस कंपनीचे वाहन (क्र. एमएच 4 ईवाय 7349) असा एकुण चार लाखांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला. आहे. पुढील कार्यवाही मोहाडी पोलिस ठाणे हे करीत आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलिस अधीक्षक डॉ. राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, पोसई हनुमान उगले, श्रीकांत पाटील, अशोक पाटील, पोकॉ. मनोज बागुल, विशाल पाटील, मयुर पाटील, तुषार पारधी, दीपक पाटील यांनी केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com