खा.डॉ.सुभाष भामरे यांना मुंबईत हलविले

पंतप्रधान मोदींच्या सूचनेवरुन हवाई दलाचे विशेष विमान धुळ्यात!
खा.डॉ.सुभाष भामरे यांना मुंबईत हलविले

धुळे । Dhule

धुळे लोकसभा मतदार संघाचे खासदार तथा माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे Dr. Subhash Bhamre यांची प्रकृती बिघडली आहे. आज विशेष विमानाने त्यांना मुंबईत हलविण्यात आले.

खा.डॉ.भामरे हे गेल्या दहा दिवसांपासून डेंग्यू व चिकनगुनिया या आजाराने त्रस्त होते. या संदर्भात आवश्यक त्या तपासण्या आणि उपचारासाठी त्यांना मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi यांच्या सूचनेनुसार बंगलोर येथून विशेष विमान बोलविण्यात आले. शहरा लगतच्या गोंदूर विमानतळावरुन खा.डॉ.भामरे यांना घेवून सकाळी 11 वाजेच्या सुमारास विमानाने उड्डाण घेवून ते मुंबईकडे रवाना झाले. त्यांच्या सोबत पुत्र डॉ. राहुल भामरे, भाचे डॉ. चारुदत्त शिंदे, शांताराम पाटील यांचा समावेश आहेे.

खा.डॉ.भामरे यांची प्रकृती स्थिर असून केवळ तपासणी करण्यासाठी मुंबईला हलविण्यात येत असल्याची माहिती त्यांचे स्वीय सहाय्यक शांताराम पाटील Self Assistant Shantaram Patil यांनी ‘दै.देशदूत’शी बोलतांना दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com