कर्जबाजारीपणातून शेतकर्‍याची आत्महत्या
धुळे

कर्जबाजारीपणातून शेतकर्‍याची आत्महत्या

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

कळगाव (ता.शिंदखेडा) येथील शेतकऱी अनिल बंशीलाल पाटील यांनी कर्जबाजारीपणातून गव्हाच्या शेतात विषारी पदार्थाचे सेवन करून आत्महत्या केल्याची घटना आज दि. 4 रोजी दुपारी घडली.

ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेले नुकसानीमुळे विविध कार्यकारी सोसायटीचे कर्ज कसे फेडावे, अशा विवंचणेत ते वावरत असल्याचे त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले. त्यांना नातेवाईकांनी धमाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.

तेथून जिल्हा रुग्णालय नेत असतांना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अनिल पाटील यांच्या पश्चात पत्नी, दहा वर्षे वयाचा मुलगा चेतन, आठ वर्षाची मुलगी सृष्टी, भाऊ, आई-वडील असा परिवार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com