भल्या पहाटे अप्पर तहसीलदारांनी अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले

दोन लाख 45 हजार रुपये दंड वसूल
भल्या पहाटे अप्पर तहसीलदारांनी अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले

दोंडाईचा - Dondaicha - श.प्र :

भल्या पहाटे चार वाजेच्या सुमारास दोंडाईचा अपर तहसीलदार सुदाम महाजन यांंनी साक्री तालुक्यातील बळसाणे येथील अवैध वाळू वाहतूक करणारी दोन ट्रॅक्टर पकडली.

साक्री तालुक्यातील बळसाणे येथून अवैध वाळू उपसा करून शिंदखेडा तालुक्यातील कर्ले येथे नेत होते. सापळा रचून दोन्ही ट्रॅक्टर पकडण्यात आले.

त्यात पहिल्या ट्रॅक्टरचा चालक योगेश दिलीप गिरासे रा.बळसाने व दुसर्‍या ट्रॅक्टरचा चालक पिंटू धर्मा खैरनार रा.बळसाने असून दोन्ही ट्रॅक्टर मालक दरबारसिंग लालसिंग सनेर रा.बळसाने ता.साक्री हे आहेत.

त्यांना प्रत्येकी ट्रॅक्टरला एक लाख 22 हजार 500 रूपये दंड केला असून एकूण 2,45,000 दंड वसूल करण्यात आला व दोन्ही ट्रॅक्टर दोंडाईचा पोलीस स्टेशनला जमा केली आहेत.

सदर कारवाई अपर तहसिलदार सुदाम महाजन, तलाठी कर्ले सुभाष शिवदास कोकणी, तलाठी खर्दे बु दीपक अच्युतराव भगत, तलाठी शेवाडे नारायण सखाराम माजलकर, युवराज माळी व पोलीस पाटील कर्ले पी.डी. पाटील यांच्या पथकाने केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com