दोंडाईचा - Dondaicha - श.प्र :

येथील उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.ललितकुमार चंद्रे यांचा पदभार काढण्यात आला असून त्यांच्या जागी डॉ. भूषण काटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शहरातील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक वर्ग -1 आहरण व संवितरण अधिकारी पदाच्या अतिरिक्त कार्यभार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिकराव सांगळे यांच्या आदेशान्वये डॉ. ललितकुमार चंद्रे यांच्याकडे देण्यात आले होता.

परंतु डॉ. ललितकुमार चंद्रे यांच्याविरुद्ध कोवीड 19 रुग्णांच्या नियोजनाबाबत दोंडाईचा परिसरातील जनतेच्या व लोकप्रतिनिधिच्या वारंवार तक्रारी या कार्यालयास प्राप्त होत आहेत. म्हणून डॉ. चंद्रे याचा पदाभार काढण्यात आला असून त्यांच्या जागी डॉ. भूषण काटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तसे आदेश जिल्हा शल्यचिकित्सकांनी काढले आहे. डॉ. काटे यांनी त्वरीत रुग्णालयाचा कार्यभार हाती घेऊन प्रशासकीय काम पहावे, असे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सांगळे यांनी दिले आहे.

शहरात मागील काही महिन्यापासून वैद्यकिय अधीक्षक डॉ. चंद्रे यांचा रुग्णालयातील वाद जिल्हाधिकारी, प्रांतधिकारी यांच्या समोर आला होता.

यावरून अनेक वेळा समज देण्यात आली होती, परंतु रुग्णालयातील गलथान कारभारात सुधारणा होत नव्हती. रुग्णांचे हाल होत होते.

परंतू नवीन अधिक्षक आता सर्व वाद मिटवून नागरिकांना चांगली सुविधा देतील, अशी अपेक्षा सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. उद्या वैद्यकीय अधिक्षक पदाचा पदभार डॉ. भुषण काटे घेणार असल्याची. माहिती त्यांनी देशदूतशी बोलतांना दिली.