दोंडाईचा - Dondaicha - श.प्र :

येथील चार सायकलीस्ट नाशिक सायकलीस्ट फाऊंडेशनच्या सोबत श्री क्षेत्र शेगाववारीला रवाना झाले आहे. विशेष म्हणजे त्यांनी देखना है कल तो चालाओ सायकल, हा नारा देत वारीला सुरूवात केली.

त्यात कलाशिक्षक राजन मोरे, महेंद्रकुमार बाविस्कर, प्रितम भावसार व परिमल कोंटूरवार हे चौघे सायकलीस्ट सहभागी झाले आहे.

या सायकल वारीला दोंडाईचा येथून आज दि.25 रोजी सकाळी 11 वाजेला सुरूवात झाली. दोंडाईचाहून धुळे मार्गे शेगाव हे 350 की.मी. अंतर हे तीन दिवसात पूर्ण करणार आहेत.

सायकल वारीला माजी मंत्री तथा आ.जयकुमार रावल यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, प्रवीण महाजन उपस्थित होते.

तसेच या वारीत दोंडाईचा पोलीस स्टेशनचे प्रभारी परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी स्वत: शिवाजी महाराज पुतळ्यापासून ते दोंडाईचा पोलीस स्टेशनपर्यंत सायकल चालवून सहभागी झाले होते. सायकलस्वार सायंकाळपर्यंत धुळे गाठणार आहे.