जुने कोळदेसह झोटवाडे शिवारात वाळू उपसा

जड वाहनांमुळे रस्त्याची झाली चाळण; शासनाच्या महसुलावर पाणी
जुने कोळदेसह झोटवाडे शिवारात वाळू उपसा

दोंडाईचा - Dondaicha - श.प्र :

शिंदखेडा तालुक्यात वाळू माफियांनी हैदोस घातला असून तापी नदीवरील जुने कोळदे शिवारातून दररोज...

दहा ते बारा ट्रॅक्टर अवैध वाळू उपसा करत आहे. या जड वाहनांमुळे शहर व ग्रामीण भागातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात चाळण झाली आहे.

दिवस-रात्र राजरोसपणे वाळूचोरी सुरू आहे. यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूलही बुडत आहे. अवैध वाळू उपसा करणारे सुसाट वेगाने वाहन चालवत असतात. म्हणून अपघात होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

वाळू माफीयांना प्रशासनाचा वचक राहिलेला दिसून येत नाही. वाळू माफियांनी डोकेवर काढले असून जुने कोळदेसह झोटवाडे शिवारातून दिवस रात्र दररोज दहा ते बारा ट्रॅक्टरद्वारे मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत आहे.

तापी नदी पात्रातून टॅक्टरने वाळू एका ठिकाणी गोळा करून जेसीबीच्या साहाय्याने डंपरमध्ये वाळू भरून नाशिक, पुणे, मुंबई, आदी ठिकाणी विक्री केली जात आहे.

तालुक्यातील पांझरा, तापी, बुराई, अमरावती नदीकाठच्या गावांना पाणी टंचाई भासत आहे. तापी नदीच्या पात्रात झालेल्या प्रचंड वाळू उपशामुळे गेल्या वर्षी नदीकाठच्या गावांमध्ये थोड्याफार प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली होती.

जुने कोळदे व झोतवाडे शिवारातून हजारो ब्रास वाळूचा उपसा होत आहे. यास जबाबदार संबंधितांवर जिल्हाधिकारी काय कारवाई करता, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

शनिवारी मध्यरात्री कालिपिली वाहनाने जुने कोळदे येथील तापी नदी पात्रा छापा टाकला. तेथे 25 ते 26 टॅक्टर आढळून आले.वाळूमाफियांनी खळ्यात, मोकळ्या जागेत अवैध वाळूचा साठा केलेला दिसून आला. या अवैध साठ्याच्या पंचनाम्याचे काम तलाठी आणि मंडळ अधिकार्‍यांमार्फत सुरू आहे. वाळूमाफिया हे घरकुलासाठी वाळू वाहतूक करीत असल्याच्या कांगावा त्यांनी केलेला आहे. परंतू घरकुलासाठी देखील मोफत किंवा अवैधरित्या वाळू उपसा करता येत नाही. संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल.

सुदाम महाजन, अप्पर तहसीलदार

वाळू ढिगारे केलेले आढळले

अप्पर तहसीलदार सुदाम महाजन यांच्या आदेशाने शनिवारी रात्री उशिरापर्यंत पंचनामे करण्याचे सुरू होते. रविवार असल्यामुळे अहवाल जमा करता आला नाही.

सोमवारी अहवाल जमा करू. मात्र स्थानिक नागरिकांनी आम्हाला सहकार्य करायला पाहिजे. खळ्यात, मळ्यात बेवारस वाळूचा ढिगारे मिळून आले आहेत.

वाळूला चुन्याने गोल वर्तुळ आकार मारण्यात आलेले दिसून आल्याची माहिती तलाठी मनोहर पाटील यांनी दिली.

चारी कोरूनही वाळू उपसा

रात्रीच्या वेळी कोळदे, लंगाणे, लोहगाव आदी ठिकाणावरून अवैध वाळू उपसा करून चोरी होत असल्याीच माहिती स्थानिक तलाठींंना मिळाली होती. त्याची दखल घेत कोळदे शिवाराच्या तापी नदीच्या पायथ्याशी जेसीबीच्या साहय्याने वरवर चारी खोदून दिली होती.

मात्र मुजोर वाळू चोरट्यांनी चारीच्या बाजूने जागा करून वाळू उपसा सुरु होता. शनिवारी अप्पर तहसीलदार सुदाम महाजन यांनी कारवाई केली.

त्यावेळी वाळु माफियांनी पळ काढला. मात्र तिथे वाळूचे ढिगारे मिळून आले. शासनाचा महसूल बुडवून वाळू चोरी करणार्‍यावर गुन्हे दाखल करण्यात, यावे अशी ग्रामस्थांमधून होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com