तिघा पोलीस कर्मचार्‍यांना कोठडी

मोहन मराठे मृत्यूप्रकरण
तिघा पोलीस कर्मचार्‍यांना कोठडी

दोंडाईचा - Dondaicha - वि.प्र :

मोहन मराठे मृत्यू प्रकरणी तीन पोलीस कर्मचार्‍यांना 16 डिसेंबर पर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश शिंदखेडा न्यायालयाने आज दिला. तर सहायक पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड हे फरार आहेत.

या प्रकरणी काल पोलीस हवालदार वासुदेव जगदाळे, पोलीस नाईक सीताराम निकम, राहुल सोनवणे या तीन पोलिस कर्मचार्‍यांना अटक करण्यात आली.

आरोपीची संख्या वाढण्याची शक्यता

मोहन मराठे मृत्यू प्रकरणातील फरार आरोपीचा शोध घेऊन त्वरीत कारवाई करण्यात यावी. तसेच या प्रकरणातील दोषींची संख्या जास्त असण्याची शक्यता मराठा समाजाचे सामाजिक कार्यकर्ते, माजी नगरसेवक विजय मराठे यांनी व्यक्त केली आहे. सीआयडीचे पोलीस निरीक्षक समीर वाघ यांची आज सायंकाळी त्यांनी भेट घेतली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com