मृतदेह अदलाबदल झालाच कसा ?

मागितला खुलासा - तहसीलदारांचे वैद्यकीय अधीक्षकांना आदेश
मृतदेह अदलाबदल झालाच कसा ?

दोंडाईचा - Dondaicha - श.प्र :

येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना बाधित रुग्णाच्या मृतदेहाची अदलाबदल झाल्याच्या प्रकाराची गंभीर दखल अपर तहसीलदार सुदाम महाजन यांनी गंभीर दखल घेतली आहे.

याबाबत वैद्यकीय अधिक्षक डॉ. भुषण काटे यांचा लेखी खुलासा तत्काळ मागविला आहे.उपजिल्हा रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णाच्या मृतदेहाची अदलाबदल झाली होती.

अंत्यसंस्कार झाल्यानंतर दि. 11 रोजी दुपारी हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे मयताच्या नातेवाईकांनी भोंगळ कारभार बद्दल संताप व्यक्त केला.

याबाबत अप्पर तहसीलदार सुदाम महाजन यांनी तत्काळ दखल घेत आपण कोणत्याही प्रकारची खबरदारी घेतलेली दिसून येत नाही.

ही बाब प्रशासकीयदृष्ट्या गंभीर स्वरुपाची आहे. म्हणून याबाबत वैद्यकीय अधिक्षक डॉ. भुषण काटे यांना लेखी खुलासा तत्काळ कार्यालयात सादर करण्याचे कळविले आहे.

खुलासा मुदतीत प्राप्त न झाल्यास तुमचे काही एक म्हणणे नसल्याचे गृहीत धरून पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही नमुद केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com