दारुची चोरटी वाहतूक; दोन लाख 68 हजारांचा मुद्देमाल जप्त

दारुची चोरटी वाहतूक; दोन लाख 68 हजारांचा मुद्देमाल जप्त

दोंडाईचा - Dondaicha - श.प्र :

अ‍ॅपे रिक्षामधून देशी, विदेशी, व बिअरची अवैधरित्या वाहतूक करणार्‍यास दोंडाईचा पोलिसांनी ताब्यात घेतले.

या ठिकाणाहून 17 बॉक्समधील 68 हजार तीनशे तीस रुपये किंमतीची दारू व वाहतूकीसाठी वापरलेली अ‍ॅपेरिक्षा असा एकूण 2 लाख 68 हजार तीनशे 28 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोंडाईचा पोलीस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरिक्षक दुर्गेश तिवारी यांना मिळालेल्या गुप्त माहिती वरून अ‍ॅपे रिक्षा (क्र. एम. एच.18/ बी. एच. 0541) मध्ये देशी, विदेशी बिअरची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे पथकाने मोनाली चौफुली, दोंडाईचा शहरातून तसेच बायपास रोडने येणारी वाहने तपासली.

त्यावेळी बायपास रोडवरून मांडळ चौफुली कडून येणारी अ‍ॅपेरिक्षा तपासली. त्यावेळी रिक्षा चालकास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव सचिन गोकुळ परदेशी (वय 28 वर्ष) रा. चिमठाणे शिवाजी चौक ता. शिंदखेडा असे सांगितले.

विना परमिटाशिवाय अवैधरित्या ताब्यात दारु बाळगून तिची विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक केल्याचे पुढे आले.

साहय्यक पोलीस निरीक्षक संतोष लोले, उपनिरीक्षक देविदास पाटील, उपनिरीक्षक सचिन गायकवाड, पोलीस नाईक मुकेश अहिरे, संदीप कदम योगेश पाटील यांच्या पथकाने आज दि. 5 मे रोजी संशयित सचिन परदेशी याला ताब्यात घेतले.

68 हजार 328 रूपये किंमतीचे दारु व वाहतूकीसाठी वापरलेली अ‍ॅपेरिक्षा दोन लाख रुपये किंमतीची असा एकूण 2 लाख 68 हजार तीनशे 28 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com